बारामतीत विधानसभा पोटनिवडणुक; सुनेत्रा पवार आघाडीवर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. या दोन्ही ठिकाणची आज मतमोजणी पार पडत आहे. दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक घ्यावी लागली.विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकी 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित दादांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (23 एप्रिल) बारामती विधानसभेची झालेली पोटनिवडणूक सुनेत्रा पवार यांनी लढवली. आज 5 राज्यांसह बारामतीच्या निवडणुकीचाही निकाल असून मतमोजणीला सुरूवात झाली आहे.ही निववडणूक बिनविरोध व्हावा यासाठी महायुतीचा भर होता, राज्यातील इतर विरोधी पक्ष, मोठ्या पक्षांनी उमेदवार दिले नसले तरीही काही अपक्षांनीही ही निवडणूक लढवली.

सुनेत्रा पवारांची 26773 मतांची आघाडी, अभिजीत बिचुकले, करुणा मुंडेंना किती मतं?, धक्कादायक आकडेवारी
बारामती पोटनिवडणूक

सुनेत्रा पवारांची 26773 मतांची आघाडी

करुणा मुंडे 10 मते

अभिजीत बीचुकले 7 मते

नोटा 28

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles