निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्ष, एकाच वेळी ९० लाख मतं डिलिट…बड्या नेत्याचा गंभीर आरोप

देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंतच्या प्राथमिक कलानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर तामिळनाडूत टीव्हीके १०६ जागा, पुद्दुचेरीत भाजप २२, आसाम भाजप ९० जागांवर आघाडीवर आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीतील विधानसभा निवडणुकांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर एकाच वेळी ९० लाख मत डिलिट केल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष आहे, अशीही टीका केली आहे.सुरुवातीचे कल पोस्टल मतदानाचे होते. आता हळूहळू मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आपल्याला निकाल काय लागणार हे पाहण्यासाठी भरपूर वेळ आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजप स्पर्धेत आहे किंवा टक्कर देतंय. ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग, भाजप आणि मोदी-शाह यांनी जवळपास ९० लाख मत मतदार यादीतून काढली. जेव्हा एकाच वेळी ९० लाख मत डिलिट केली जातात, त्याचा परिणाम निकालावर होतो, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

मतदारांनी अद्याप कौल दिलेला नाही. ठिकठिकाणी सुरुवातीचे कल आहेत. मतमोजणीच्या २० ते २२ फेऱ्या सुरु असतात. शेवटच्या दोन किंवा तीन फेऱ्यांमध्येच निकाल लागतात. सध्या हे जे निकाल येतात ते सुरुवातीचे कल आहेत. आपल्याला थोडं थांबावं लागेल. २० ते २५ फेऱ्या चालतात आणि त्यानंतर निकाल लागतात. तुम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीत हे निकाल सांगू शकत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना दुसरं काम काय, निवडणुकीत तळ ठोकणं हेच त्यांचं काम आहे. देशात किंवा महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होतात, भ्रष्टाचार होतात, महागाई वाढली, नोकऱ्या नाहीत, त्या संदर्भात तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण एखाद्या राज्यात निवडणुका आल्या की मोदी शाहांचं संपूर्ण सरकार हे तळ ठोकूनच बसतं. तसे ते बसले. देशाच्या हिताचं विकासाचं काम त्यांच्या दृष्टीक्षेपात आहे असं मला तरी वाटत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles