राहुरीत अक्षय कर्डिले यांची सुसाट आघाडी; शरद पवार गटाला मोठा धक्का

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिष्ठेच्या आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी अत्यंत चुरशीच्या वातावरणात सुरू झाली आहे. मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असतानाच, सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र समोर येत आहे.

टपाल मतमोजणीपासूनच भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपले वर्चस्व राखले होते. त्यानंतर ईव्हीएम च्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीअखेर प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी प्रतिस्पर्ध्यांवर तब्बल ९,६३७ मतांची लक्षणीय आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांनी मिळवलेल्या मतांमुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


अठराव्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले 90 हजार 638 मतांनी आघाडीवर.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासूनच एकतर्फी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाल्यापासून भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आघाडी प्रत्येक फेरीगणिक सुसाट वाढत असून, अठराव्या फेरी अखेर त्यांनी विजयाच्या दिशेने मोठा टप्पा गाठला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles