Tata EV नवीन कर्व्ह.इव्ही सिरीज एक्स लॉन्च…१६.९९ लाख रुपयांच्या आकर्षक किंमतीत

Tata EV या भारतातील आघाडीच्या वाहन कंपनीने नवीन कर्व्ह.इव्ही सिरीज एक्स लॉन्च केली आहे,. १६.९९ लाख रुपयांच्या आकर्षक प्रारंभिक किंमतीत सुरू होणाऱ्या कर्व्ह.इव्ही सिरीजएक्समध्ये दोन व्हेरियन्ट आहेत- अॅकम्प्लिश्ड एक्स५५ आणि एम्पावर्ड एक्स५५. पाच रंगांचे पर्याय प्रदान करणाऱ्या कर्व्ह.इव्ही सिरीजएक्समध्ये प्रसिद्ध डार्क आवृत्ती बरोबरच एक लक्षवेधी नायट्रो क्रिमसन रंगाचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

अंदाजे ४०० किमीची रिअल-वर्ल्ड रेंज आणि ५०२ किमीच्या एआरएआय प्रमाणित (पी१+पी२) रेंज सह, कर्व्ह.इव्ही सिरीजएक्स एक विश्वसनीय इंटरसिटी कार आहे, ज्यात स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. आजीवन एचव्ही बॅटरी वॉरंटी देणारी सिरिजएक्स ही कर्व्ह.इव्ही लाइन-अपला सुस्पष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण बनवते आणि या गाड्या उच्च मूल्य प्रदान करतात.

इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सहजप्राप्य आणि लाभदायक व्हावी कर्व्ह.इव्ही सिरीजएक्स ग्राहकांना भारताच्या पहिल्या एसयूव्ही कूपचा अनुभव घेण्यासाठी सज्ज आहे. या गाड्यांमध्ये ५५ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक आहे, ज्यामुळे गाडीला ५०२ किमी. ची दीर्घ रेंज मिळते आणि आंतर-शहराचा प्रवास सुलभ होतो. तसेच आजीवन एचव्ही बॅटरी वॉरंटी देखील उपलब्ध करून दिली आहे, असे नवीन कर्व्ह.इव्ही सिरीजएक्स दाखल करताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles