Maharashtra Politics News सुनेत्रा पवार २०२९ ला मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील….

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीतील 2029 च्या निवडणुकीवर भाष्य केलं. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार 2029 च्या मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढवतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय.

सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने खासदारकीची जागा रिकामी झाली असून तिथे तुमचे नाव चर्चेत आहे, असा प्रश्न विचारला असता, चर्चा होतेय पण मी इथेच सर्वांसाठी काम करेल, असे म्हणत जय पवार यांनी आपण खासदार म्हणून जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, बारामतीत 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानेही राष्ट्रवादीचे युवा नेते तथा अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभा राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे वक्तव्य जय पवार यांनी केले आहे.

जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार ह्याच बारामतीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट केले, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या उमदेवार म्हणून त्या निवडणूक लढवती अशी आम्हाला आशा असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles