वारकरी संप्रदायातील घुसखोरी विषयावरून विलास लवांडे यांच्यावर शाईफेक… video

शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने गेल्या एक महिन्यापासून वारकरी संप्रदायातील घुसखोरी या विषयावर बॅनरबाजी आणि जाहीर वक्तव्य केल्याने काही वारकरी भडकले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी यापूर्वी जाहीरपणे वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण यावर भाष्य केले. त्यावरून हभप संग्राम भांडारे यांनी सहकाऱ्यांसह त्यांच्यावर शाईहल्ला केला. हवेली तालुक्यातील आळंदी मातोबाची इथं भंडारे यांनी लवांडे यांच्या अंगावर शाई ओतली. त्यानंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठत संग्राम भंडारे यांच्याविरोधात तक्रार दिली.

या सर्व घटनेत विकास लवांडे यांनी बाजू मांडली. त्यांनी ट्वीट केले आहे. “वारकऱ्यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही 10/15 गुंड गोरक्षक यांनी तीन फोर व्हीलर मध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची तालुका हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर आत्ता 10 वाजता मी परत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाही ओतली आणि मला धक्काबुक्की केली पिस्तूल दाखवला आहे. नंतर पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे . पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब त्या सर्व माझ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावाmतोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles