Gold-Price: सोन्याचे दर घसरले प्रति तोळ्यामागे इतक्या रुपयांची घसरण; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

सोन्याचे दर दररोज बदलत असतात. सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर सतत वाढत असल्याने सर्वसामान्यांना फटका बसला आहे. दरम्यान, आज सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.आज सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३३० रुपयांनी घसरले आहेत. सोन्याचे दर भविष्यात असेच घसरण्याची अपेक्षा आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर वाचा.

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३३० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५२,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं २६४ रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,२१,८८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३,३०० रुपयांनी घसरण आहेत. हे दर १५,२३,५०० रुपये झाले आहेत.२२ कॅरेट सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण झाली असून हे दर १,३९,६५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २४० रुपयांनी घसरले असून हे दर १,११,७२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ३००० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर १३,९६,५०० रुपये झाले आहेत.

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१४,२६० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोनं २०० रुपयांनी घसरले असून हे दर ९१,४०८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं २५०० रुपयांनी घसरले असून हे दर ११,४२,६०० रुपये झाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles