भाजपच्या अहिल्यानगर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी महावीर कांकरिया यांची निवड

समर्पित व एकनिष्ठ कार्यकर्ते हीच भाजपची मोठी ताकद : राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर: भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते महावीर कांकरिया यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कांकरिया यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, बाबासाहेब सानप, युवा मोर्चाचे अध्यक्ष रूद्रेश अंबाडे, देवेंद्र दुधाले, ॲड. देवेंद्र बंब आदी उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कांकरिया यांना शुभेच्छा देताना म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आज देशातील सर्वात मोठा लोकप्रिय आणि राष्ट्र उभारणीत योगदान देणारा पक्ष आहे. समर्पित व निष्ठावंत कार्यकर्ते ही पक्षाची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भारत विश्व गुरू म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली पक्ष अतिशय मजबूत बनला आहे. महावीर कांकरिया हे मागील ३० वर्षांपासून नगर शहरात अतिशय निष्ठेने पक्ष संघटनेत काम करत आहेत. त्यांच्या सारख्या तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षाकडून उचित सन्मान निश्चितच केला जातो.

महावीर कांकरिया म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्र निर्माणात योगदान देणारा पक्ष आहे. पक्षाचे ध्येय धोरणे आणि विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच प्रयत्न असतो. तीस वर्षांपासून संघटनेत काम करताना पदाची अपेक्षा केली नाही. आता पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. या निवडीबद्दल कांकरिया यांचे माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles