onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -09-05–2026 एकुण कांदा गोणी -87,281
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 900 ते 1100
2 नंबर= 600 ते 900
3 नंबर= 350 ते 600
4 नंबर= 150 ते 350
————————————————————————————————————————————————–
सीना नदीच्या पात्रात नवजात अर्भक आढळले
अहिल्यानगर-शहर परिसरातील आनंद नगर येथील सीना नदीच्या पात्रात एका अज्ञात नवजात पुरुष जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर येथील विक्रांत जिमच्या मागील बाजूस असलेल्या सीना नदीच्या पात्रातील सिमेंटच्या नाल्यात एक अर्भक तरंगत असल्याची माहिती नगरसेवक दत्ता गाडळकर यांनी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाढे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी अंदाजे आठ दिवस वयाचे पुरुष जातीचे अर्भक पालथ्या अवस्थेत पाण्यात तरंगताना दिसून आले. या अर्भकाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. पोलिसांनी तातडीने अग्निशमन दल आणि न्यायवैद्यक पथकाला पाचारण केले. नायब तहसीलदार गणेश भानवसे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह पात्राबाहेर काढण्यात आला.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या अपत्य जन्माची माहिती लपवण्याच्या उद्देशाने या अर्भकाचा मृतदेह नदीत फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल दिलीप गाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघ हे करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


