सिनेसृष्टीतून निवृत्ती घेऊन साऊथ सुपरस्टार थलपती विजययानं राजकारणात धमाकेदार एन्ट्री घेतली. पहिल्यांदाच निवडणुक लढवणाऱ्या थलपती विजय याच्या पक्षानं प्रस्थापितांना धूळ चारली. विजयच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’या नवख्या पक्षानं सर्वाधिक जागा मिळवून सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. आपल्या दमदार कामगिरीनंतर राजकीय पटलावर डावपेच टाकत आता अखेर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची माळ थलपती विजय यांच्या गळ्यात पडणार आहे. थलपती विजय हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तामिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर सत्तास्थापनेचा तिढा सुटलाय.
तमिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेला ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पण आज सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ज्यानंतर राजकारणात मोठ्या हलचाली सुरु झाल्या आहेत. तर सोशल मीडियावर सर्वत्र फक्त थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दोघांचं रिलेशनशिप सध्याचा फार मोठा विषय ठरत आहे. 107 जागांवर विजय मिळवल्यानंतर त्रिशा आणि विजय यांच्या नात्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला आहे… दरम्यान, अनेक वर्षांपूर्वी त्रिशा हिने स्वतःच्या मोडलेल्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. जे आता पुन्हा चर्चेत आलं आहे.
त्रिशा हिच्या मोडलेल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 2015 मध्ये त्रिशा कृष्णन हिने उद्योजक वरुण मनियन याच्यासोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. पण लग्नापूर्वीच दोघांचं नातं मोडलं… तेव्हा त्रिशा हिच्या मोडलेल्या लग्नाबद्दल अनेक चर्चा रंगल्या… पण त्यानंतर त्रिशा हिने स्वतः पुढे येत मोडलेल्या लग्नाचं खरं कारण सांगितलं होतं.
अशातच, जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या हा महत्त्वपूर्ण राजकीय दिवसासाठी चेन्नई सज्ज होत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी स्टेडियमबाहेरील वातावरण उत्साह, कुतूहल आणि थोड्याशा जुन्या आठवणींच्या मिश्रणाने भारलेले आहे. हा अशा काही मोजक्या क्षणांपैकी एक आहे, जिथे चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचा नकळत मेळ घातला जातो आणि चित्रपटविश्वातील ओळखीचे चेहरे प्रत्यक्ष जीवनातील बातम्यांमध्ये झळकतात. अशातच कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दाखल झालेल्या मान्यवरांमध्ये अभिनेत्री तृषा कृष्णन हिचा समावेश सर्वात लक्षवेधी ठरला आहे. विजयच्या शपथविधी सोहळ्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचताना तिने अत्यंत साधेपणा आणि तरीही आपुलकीचा भाव कायम राखला होता. यावेळी देखील त्रिशाने मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे.कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी, त्रिशाने तिच्या चेन्नई येथील घरातून निघताना माध्यमांशी थोडक्यात संवाद साधला. एएनआयने शेअर केलेल्या दृश्यांनुसार, ‘तामिळनाडूसाठीच्या या मोठ्या दिवशी’ तिला कसे वाटले, असे विचारले असता, तिने हसतमुखाने आणि साधेपणाने उत्तर दिले, “धन्यवाद, उत्सुकतेने वाट पाहत आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.


