अखेर पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज तमिळनाडूत शपथविधी पार पडला आहे. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक, नेते, उपस्थित होते, विजय यांनी शपथ घेताना जमलेल्या जनतेने टाळ्या शिट्या वाजवून एकच उत्साह व्यक्त केला, तर विजय हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना त्यांचे आई वडील भावूक झाल्याचे दिसून आले.


