Gold-Price: सोने स्वस्त, नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर थेट घसरण,! जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये सतत चढउतार बघायला मिळत आहे. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या. मात्र, त्यानंतर सोने स्वस्त झाले. यादरम्यान अनेकांनी हीच योग्य वेळ असल्याचे सांगत जोरदार सोन्याची खरेदी केली. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा आजही 40 ते 50 हजारांनी स्वस्त आहे. मात्र, यादरम्यानच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोने एक वर्षासाठी खरेदी करू नका असे आवाहन केले. यामुळे पुढील काही काळात सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. परकीय चलनाला गती न देण्याकरिता त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. गेल्याच आठवड्यात भारतातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या भावात मोठा चढउतार बघायला मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोन्याचे आजचे भाव पुढे आले आहेत. आज 11 मे 2026 रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. दिल्ली आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किमती घसरत आहेत. सतत सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत. त्यामध्येच पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये किंचित घसरण दिसून आलीये.आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,350 रूपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,650 रूपये आले. जवळपास 200 रूपयांनी सोन्याच्या भावात घसरण नोंदवली गेली. दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,500 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,800 रूपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली. भारतीयांना मोठे आवाहन करत पुढच्या एक वर्षापर्यंततरी सोने खरेदी करू नका असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles