पहिल्या महिला आमदार २९ वर्षीय एस. कीर्तना… जोसेफ विजय यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी

तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या मंत्रिमंडळात २९ वर्षीय एस. कीर्तना यांची मंत्री म्हणून वर्णी लागली आहे.

सहा दशकांहून अधिक काळ टिकलेले पुरुषांचे वर्चस्व मोडीत काढत, शिवकाशी मतदारसंघातून निवडून आलेल्या २९ वर्षीय टीव्हीके आमदार एस. कीर्तना या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. या मतदारसंघातून विजयी होणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत.

निवडणुकीत जिंकल्यानंतर एस. कीर्तना यांनी हिंदीतून संवाद साधला होता ज्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष्य वेधले गेले होते. आपल्या नेत्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना तो समजावा, यासाठी आपण हिंदी भाषेची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.

कीर्तना संपत या तमिळगा वेत्री कळघमच्या नवनिर्वाचित आमदार आहेत. त्यांनी पूर्वी एक पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम केले असून त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. त्यांनी यापूर्वी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसोबत काम केले आहे.

एस. कीर्तना यांना एकापेक्षा जास्त भाषा अवगत आहेत. तमिळ माध्यमातील सरकारी शाळेत शिकलेल्या कीर्तना यांनी पुढे इतर भाषांवर प्रभुत्व मिळवले.

निवडणूक प्रचारावेळी एस. कीर्तना यांनी विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीमधील विकास हा केंद्रस्थानी ठेवला होता. त्यांनी सुरक्षितता आणि आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधांच्या समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले. तसेच त्यांनी फटाक्याची राजधानी असलेल्या मतदारसंघात फक्त एकच अग्निशामक केंद्र असल्याचा मुद्दा अधोरेखित केला, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles