नगरमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचे दत्ता जाधव बंद खोलीतील चर्चाना उधाण

अन्न व पुरवठा नागरी मंत्री नामदार छगन भुजबळ यांची नियुक्ती येथील नंदनवन जाधव फार्म हाऊस येथे सदिच्छा भेट

शिवसेनेचे दत्ता जाधव यांच्याशी बंद खोलीत चर्चा

अहिल्यानगर : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी नेप्ती येथील नंदनवन जाधव फार्महाऊसला दिलेल्या सदिच्छा भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या भेटीत शिवसेनेचे दत्ता जाधव यांच्याशी काही काळ बंद खोलीत झालेल्या चर्चेमुळे विविध राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
नेप्ती परिसरातील नंदनवन जाधव फार्महाऊस येथे आयोजित या भेटीत भुजबळ यांनी जाधव कुटुंबीयांशी आत्मीय संवाद साधत विचारपूस केली. या वेळी वातावरण अतिशय उत्साहपूर्ण व आपुलकीचे होते. राजकीय चर्चांसोबतच कौटुंबिक स्नेहाचे दर्शनही या भेटीत घडले.
या प्रसंगी जाधव परिवाराच्या वतीने नामदार छगन भुजबळ यांचा पुष्पगुच्छ देऊन व शाल-श्रीफळ देत भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब जाधव, शिवसेनेचे दत्ता जाधव, माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव, नेप्ती गावचे सरपंच अंबादास पुंड, आदेश जाधव, हिरा सेठ जाधव, राज जाधव, हेमंत जाधव, हिमांशू जाधव, अश्विन जाधव, अभिजीत दळवी, बाळासाहेब कोल्हे, विकास सपाटे, ओंकार शेळके, अंजली जाधव, शुभम कोल्हे, शितल जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भेटीदरम्यान नामदार छगन भुजबळ यांनी जाधव कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील घडामोडींवरही चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विशेष म्हणजे, या भेटीत शिवसेनेचे दत्ता जाधव यांच्याशी झालेली बंद खोलीतील चर्चा चर्चेचा विषय ठरली आहे. या चर्चेचा नेमका विषय समोर. आला नसला तरी आगामी राजकीय घडामोडी, स्थानिक प्रश्न व संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या निमित्ताने नामदार छगन भुजबळ आणि जाधव कुटुंब यांच्यातील दीर्घकालीन स्नेहसंबंध पुन्हा अधोरेखित झाले. राजकारणासोबतच जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध जपण्याची परंपरा या भेटीतून दिसून आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles