राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरेंची नावं गायब, पत्र व्हायरल सुनेत्रा पवार म्हणाल्या …

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन (NCP Ajit Pawar Group) मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारणीच्या यादीत प्रफुल पटेल (Parful Patel), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे नाव नसल्याचे अनेकांच्या भुवया उंचवल्या असून चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत एक तांत्रिक चूक झाल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यांचे काम यासंदर्भात सविस्तर यादी 29 एप्रिलला दिल्याचे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या सोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचे सुद्धा नाव आहे. मात्र यामध्ये प्रफुल पटेल सुनील तटकरे या नेत्यांची नावे राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये वगळण्यात आल्याचे या यादीमध्ये दिसत आहे. परंतु या यादीमध्ये तांत्रिक आणि क्लेरिकल चुका असून या दुरुस्त केल्या जातील असं सुनेत्रा पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://x.com/SunetraA_Pawar/status/2053921981989597387?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2053921981989597387%7Ctwgr%5Ef4550c67512d52d7141f3ea168fe445085b7d514%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fpolitics%2Fsunetra-pawar-on-ncp-national-executive-list-letter-viral-not-name-of-sunil-tatkare-praful-patel-chhagan-bhujbal-maharashtra-politics-marathi-news-1423718

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles