पुढील ४८ तासात नैऋत्य मान्सून () अंदमानचा समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांवरील काही भागात दाखल होण्यास अनुकूल वातावरण, ईशान्य भारत आणि दक्षिणेतील काही राज्यांत पुढील ४-५ दिवसांत जोरदार पावसाची देखील शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि कर्नाटकात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या आगेकूचसाठी पोषक परिस्थिती निर्माण होत असून १६ मेच्या आसपास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर देशातील उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. आठवडाभर अनेक भागांत तीव्र उष्णतेची परिस्थिती राहू शकते. राजस्थानमधील बारमेर येथे काल देशातील सर्वाधिक ४८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान खात्याने नैऋत्य मान्सून आगमनचा अंदाज वर्तवला आहे. अनुकूल हवामान परिस्थिती असल्याने 6 जून रोजी कोकणात मान्सूनचे आगमन होणार असून, त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागरातील काही भाग आणि निकोबारांच्या बेटांवर दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे केरळ आणि राज्यात देखील मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.
IMD ने यापूर्वी 19 मे पर्यंत मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर 31 मे पर्यंत मान्सून देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये पोहोचेल, अशी माहिती दिली आहे.


