तीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त जर कोणताही नेता तुरुंगात राहिला असेल मग तो पंतप्रधान मुख्यमंत्री असो वा मंत्री असो,अशा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या पदावर राहता येणार नाही, असा कायदा आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून लवकरच त्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
हा कायदा अमलात आणताना त्यात कोणत्याही उणिवा राहू नये, तो प्रभावी पणाने अमलात यावा, यासाठी देशाच्या लोकसभा आणि राज्यसभेचे सभासद यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. त्यात विविध राज्याच्या सचिवांच्या सोबत बैठका घेऊन कायदा अधिक प्रभावी रित्या कसा वापरता येईल, आणि कसा आणता येईल, यावर चर्चा होत असल्याच ही उज्ज्वल निकम यांनी म्हटल आहे.
आगामी काळात देशावर आर्थिक संकट येण्याची शक्यता लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेल, यासह सोने खरेदी बाबत जनतेला काटकसरीचे आवाहन केले आहे. याचा अर्थ त्यांनी भीती दाखवली असा नव्हे, तर कोणत्याही परिस्थितीला आपण सामोरे जाताना सावधानकी बाळगली पाहिजे, यासाठी पंतप्रधानांनी आव्हान केले असल्याच उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.


