राज्य सरकारची नवी योजना; तिसऱ्या मुलासाठी ३० हजार अन् चौथ्या अपत्यासाठी देणार ४० हजार रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

आंध्र प्रदेशमधील राज्य सरकारनं राज्यातील जनतेसाठी एक अनोखी योजना सुरू केली आहे. ही योजना ऐकून तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. लोकसंख्या वाढतेय म्हणून देशातील सरकार चिंतेत पडलंय दुसरीकडे चंद्रबाबू नायडू सरकारनं चार अपत्य झालेल्यांना आर्थिक साहाय्य करण्याची योजना सुरू केली आहे. राज्य सरकार आता तिसरं अपत्य झाल्यास ३० हजार आणि चौथे बाळ झाल्यास नागरिकांना ४० हजार रुपयांची रोख आर्थिक मदत सरकार करणार आहे.

चंद्राबाबू नायडू म्हणाले, मी एक नवा निर्णय घेतला आहे, आम्ही तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर लगचेच 30 हजार रुपये देणार आहोत. याशिवाय चौथ्या मुलाच्या जन्मानंतर लगेचच 40 हजार रुपये मिळतील, हा योग्य निर्णय नाही का? असं नायडू म्हणाले. स्वर्ण आंध्र आणि स्वच्छ आंध्र स्वच्छता कार्यक्रमात नायडू बोलत होते.

चंद्राबाबू नायडू यांनी काही वर्षांपूर्वी लोकसंख्या नियंत्रणाचं समर्थन केलं होतं. मात्र, आता जन्म दर वाढवण्यासाठी समाजानं एकत्र आलं पाहिजे, असं नायडूंनी म्हटलं. चंद्राबाबू नायडू यांनी काही दिवसांपूर्वी दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी 25 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली होती.

चंद्राबाबू नायडू यांनी 5 मार्चला विधानसभेत माहिती देताना म्हटलं होतं की राज्य सरकार दुसऱ्या मुलाला जन्म देणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपयांचा पोत्साहन भत्ता देण्याचा विचार करत आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या मते, बदलत्या सामाजिक आणि आर्थिक ट्रेंडमधील बदलाचा कुटुंबाच्या आकारावर परिणाम होतं आहे. अनेक जोडपी एका मुलाचा पर्याय स्वीकारत आहेत. तर, काही लोकं पहिली मुलगी असल्यास दुसऱ्या मुलाला प्राधान्य देत आहेत. यामुळं लोकसंख्येच्या वाढीचा दरात घसरण होत असल्याचं त्यांनी म्हटलं.एकूण 2.1 असा जन्मदर कायम राखण्याची गरज असल्याचं नायडूंनी म्हटलं.

चंद्राबाबू नायडू यांनी प्रत्येक महिलेचा सरासरी प्रजनन दर 2.1 राखल्यास लोकसंख्या स्थिरावेल. अन्याथा लोकसंख्या घटेल आणि वयस्कर समाजामुळं अनेक देशांच्या आर्थिक विकासावर परिणाम होऊ शकतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles