दिनांक 16/05/2026 रोजी रात्री उशिरा प्राप्त गोपनीय माहितीनुसार श्रीगोंदा पोलीस पथकाने बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील पिसोरे बुद्रक ता श्रीगोंदा येथे अवैध जुगार अड्डयावर रात्री 22/30 वा ते दि 17/05/2026 रोजीचे पहाटे 02/30 वा पावेतो कारवाई केली असता सदर ठिकाणी 08 इसम जागीच पकडण्यात आले असुन 02 इसम एक मोटरसायकल घेऊन पळुन गेले आहेत.
सदर कारवाईमध्ये पुढीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला आहे.
1) रोख रक्कम – 76800/- रुपये
2) वाहने ( चार चाकी 2, दोन चाकी 6) – 26,00,000/- रुपये
3)10 मोबाईल फोन – 5,11,000/- रुपये
4)1लॅपटॉप- 70,000/- रुपये
असे
एकुण मुद्देमाल किंमत 32,57,800/-रुपये
वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल आरोपींसह बेलवंडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. सुदर्शन मुम्मका, मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री. वैभव कलुबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिक्षक श्री. प्रविणचंद्र लोखंडे यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे
छापा पथकातील श्रीगोंदा चे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोहेकॉ संभाजी वाबळे , पोकॉ महादेव कोहक, पोकॉ/ शरद गावडे, पोकॉ/ रविंद्र जाधव, पोकॉ/ सचिन वारे
सर्व नेमणूक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी केली
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डयावर धाड..मुद्देमाल किंमत 32,57,800/-रुपये
- Advertisement -


