सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून बदल होताना दिसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, आज सोन्याचे दर घसरले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७१० रुपयांनी घसरले आहेत.
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७१० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५६,२२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५६८ रुपयांनी घसरले असून हे दर १,२४,९७६ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७,१०० रुपयांनी घसरले असून हे दर १५,६२,२०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामगे ६५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४३,२०० रुपये झाले आहेतय ८ ग्रॅममागे सोनं ५२० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर १,१४,५६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ६,५०० रुपयांनी घसरले असून हे दर १४,३२,००० रुपये झाले आहेत.
‘एक वर्ष सोने खरेदी थांबवा’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सराफा बाजारात मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने-चांदीचे दर कोसळत आहेत. तर दुसरीकडे भारतीय बाजारात मात्र तेजी दिसत आहे. जागतिक तणाव आणि मजबूत होत असलेल्या अमेरिकन डॉलरमुळे जागतिक स्तरावर सोन्या-चांदीच्या किमतीत सोमवारी, १८ मे रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर सोन्याचा भाव १.१८ टक्क्यांनी घसरून ४,५०८ डॉलर प्रति औंसवर बंद झाला. गेल्या आठवड्यातही सोन्याच्या वायदा बाजारात ३.६ टक्क्यांची घसरण झाली होती. सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही २.७ टक्क्यांची मोठी घसरण झाली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ७५.४५५ डॉलर प्रति औंसवर आली आहे.


