अहिल्यानगरच्या विधानपरिषद निवडणुकीचा रिक्त जागेसाठी निवडणुकीचा मार्ग खुला ;असे आहे मतदार

अहिल्यानगर -जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 569 मतदारांपैकी 461 सदस्य कार्यरत आहेत. हे प्रमाण 82.47 टक्के असून, विधानपरिषद निवडणुकीच्या नियमानुसार ते 75 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने नगरच्या जागेसाठी निवडणूक घेणे शक्य असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून, त्यात अहिल्यानगरचा समावेश असेल. मात्र, या जागेबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येईल. असे असले तरी, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी (नगरसेवक) आणि कार्यरत जागांचा सविस्तर तपशील राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेकडून मागवून घेतला आहे.

त्यामुळे राज्यातील इतर जागांसोबतच अहिल्यानगरचीही निवडणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात विधान परिषदेसाठी मतदार असणारे जिल्हा परिषदेचे 75 सदस्य आणि पंचायत समितीचे 14 सभापती अशी एकूण 89 पदे सध्या रिक्त आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती अशा 16 स्थानिक संस्थांचे 461 सदस्य (नगरसेवक) सध्या कार्यरत आहेत. या सर्व सदस्यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य नसले, तरी एकूण कार्यरत सदस्यांची टक्केवारी 82 टक्क्यांवर असल्याने निवडणूक घेण्यातील मुख्य तांत्रिक अडचण दूर झाली असून निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 18 स्थानिक संस्थांमधील 569 जागा विधानपरिषद निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या निश्चित करतात. त्यापैकी सद्यस्थितीत पुढीलप्रमाणे सदस्य कार्यरत आहेत: महानगरपालिका नगरसेवक: 73, नगरपालिका नगरसेवक: 312, नगरपंचायत नगरसेवक: 76 असे एकूण कार्यरत मतदार: 461 आहे. या कार्यरत सदस्यांचा अधिकृत अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles