onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -18-05–2026 एकुण कांदा गोणी -44,934
लाल कांदा बाजार भाव

1 नंबर= 1000 ते 12002
2.नंबर= 700 ते 1000
3 नंबर= 350 ते 700

4 नंबर= 150 ते 350

————————————————————————————————————————————————–

नगरमध्ये कापड व्यावसायिक तरुणावर पिस्तूल रोखले
अहिल्यानगर शहर परिसरातील कल्याण रस्ता भागात जुन्या ओळखीच्या दोन तरुणांनी एका कपडा व्यवसायिकाशी वाद घालत थेट पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील रहिवासी सनी राजेंद्र जाधव यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सनी हे त्यांच्या मित्रासोबत घरासमोरील औषध दुकानात आले होते. त्यावेळी बोल्हेगाव येथील जुने परिचित रवी साळुंके आणि निखील चव्हाण हे दोघे तिथे आले. त्यांनी सनी यांच्याशी जुन्या कारणावरून हुज्जत घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने निखील याने सनी यांचे हात पाठीमागून घट्ट धरून ठेवले. याच वेळी रवी साळुंके याने कमरेला लावलेले पिस्तूल काढून ते लोड केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

सनी यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केली. आवाज ऐकून सनी यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक मदतीसाठी धावून आले. सर्वांनी मिळून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, संशयित आरोपींनी सनी यांच्या वडिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना लाथाबुक्क्यांनी व हाताने बेदम मारहाण केली. यावेळी सनी यांच्या वडिलांनी धाडस दाखवून आरोपीच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतले. नागरिकांची गर्दी जमताच दोन्ही आरोपी तिथून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सनी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी रवी साळुंके आणि निखील चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles