आमदार संग्राम जगताप यांच्यावर आक्षेपार्ह टीका ; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

आमदार संग्राम जगताप यांच्यावर आक्षेपार्ह टीका
अहिल्यानगर ः सोशल मीडियाचा गैरवापर करून दोन समाजांत जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आमदार संग्राम जगताप आणि हिंदू धर्माबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अनुप शेखर झाडबुके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी झाडबुके हे १७ मे रोजी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना, त्यांना इंस्टाग्रामवर एका आयडीवरून प्रसारित झालेला व्हिडिओ आढळला. या व्हिडिओमध्ये अफरोज हमीद शेख (रा. केडगाव, अहिल्यानगर) नावाच्या महिला आरोपीने आमदार संग्राम जगताप यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केली. तसेच हिंदू धर्म आणि धार्मिक श्रद्धांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. अहिल्यानगर शहराच्या नावाचा उल्लेख करून समाजात द्वेष पसरेल, असे गंभीर विधानही तिने या व्हिडिओत केले होते. या वादग्रस्त व्हिडिओमुळे अहिल्यानगर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles