पारनेर तालुक्यातील दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई

अहिल्यानगर व पुणे जिल्हयात दरोडा टाकुन दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई
प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, पारनेर तालुक्यातील करंदी येथील वस्तीवर दरोडा टाकुन सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेणारी टोळी मधील टोळी प्रमुख (1) विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे, रा. माजमपुर,ता.पारनेर,जि.अहिल्यानगर व टोळी सदस्य नामे (2) पंकज नरेश काळे, रा. निघोज,ता. पारनेर, जि.अहिल्यानगर (3) प्रविण नरेश काळे रा.सदर (4) सचिन नरेश काळे, रा.सदर (5) गिरीष आलम काळे, रा. सदर (6) संदीप उर्फ गोटया विठ्ठल मैड, रा. जवळा,ता.पारनेर,जि.अहिल्यानगर यांनी अहिल्यानगर जिल्हयातील पारनेर, पुणे ग्रामीण जिल्हयातील शिरुर, आळेफाटा, मंचर पोलीस स्टेशन हद्दीत गैरकायदयाची मंडळी जमवुन संघटीतपणे घातक शस्त्रासह व बळाचा वापर करुन जबरी चोरी करणे, दरोडा टाकणे, चोरी करणे, घरफोडी चोरी, करणे, शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करणे, असे गंभीर स्वरुपाचे 12 गुन्हे करुन दहशत निर्माण केली होती.
नमुद आरोपींविरुध्द पोलीस निरीक्षक, संतोष खेडकर, पारनेर पोलीस स्टेशन यांनी, पोलीस निरीक्षक, किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्फत प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची छाननी करुन आमचे कार्यालयात सादर केला होता. त्यावर आम्ही सदर प्रस्तावाची व कागदपत्रांची बारकाईने छाननी करुन सदरचा प्रस्ताव हा मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांना वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळणेकामी सादर केला होता.
मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी वरील आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1)(ii),3(2),3(4) ही वाढीव कलमे लावण्याची मंजुरी दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री.शिरीष वमने, उप विभागीय पोलीस अधीकारी, नगर ग्रामीण विभाग, अहिल्यानगर हे करत आहेत.
भविष्यात अहिल्यानगर जिल्हयात गंभीर स्वरुपाचे मालाविरुध्दचे व शरीराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या आरोपींवर मोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles