जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गोलेकर यांना जीवे मारण्याची धमकी

जामखेड -तालुक्यातील खर्डा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांना जीवे मारण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड रोहित उर्फ बबलू गोलेकर याच्याविरोधात खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

विजयसिंह गोलेकर (वय 45, रा. सुर्वेवाडी, खर्डा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 12 मे रोजी आरोपी बबलू गोलेकर याने व्हॉट्सॲप कॉल करून तुझ्यामुळे माझे मोठे नुकसान झाले असून 20 लाख रुपये दे, अन्यथा तुला गोळ्या घालून ठार मारीन, अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ व दमदाटीही केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आरोपीला यापूवही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगितले असता, आरोपीने तुझा ट्रॅप लावला आहे, पैसे नाही दिले तर संपवून टाकीन, अशी पुन्हा धमकी दिल्याचे म्हटले आहे. तक्रारीनुसार, त्याच रात्री उशिरा हॉट्सॲपवरून आणखी काही कॉल करण्यात आले. भीतीपोटी ते कॉल न उचलल्याचे फिर्यादीने सांगितले. त्यानंतर आरोपीकडून फोन कर, मला बोलायचे आहे, असा संदेशही पाठविण्यात आला. संबंधित स्क्रीनशॉट पोलिसांकडे पुरावा म्हणून देण्यात आले आहेत.

बबलू गोलेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंदा आहे. तो काही काळ स्थानबद्धही करण्यात आला होता. पुणे विभागातील विविध पोलिस ठाण्यांतही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.दरम्यान, एका राजकीय पदाधिकाऱ्याला थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांच्या सुरक्षेची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles