नगर शहरात लग्नसमारंभात महिलेशी गैरवर्तन करत अ‍ॅसिड टाकून जाळण्याची धमकी

अहिल्यानगर-सीटी लॉन्स येथील लग्नसमारंभात महिलेशी गैरवर्तन करत तिच्या नणंदेच्या मुलाला हिसकावून नेण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी (18 मे) रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुकुंदनगरच्या दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नाशिक येथील 31 वर्षीय पीडिताने मंगळवारी (19 मे) पहाटे फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नणंदेचे मुकुंदनगर येथील व्यक्तीशी लग्न झाले असून त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. कौटुंबिक वादामुळे नणंद सध्या मुलासह नाशिक येथे माहेरी राहत आहे. सोमवारी फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय नातेवाईकांच्या लग्नासाठी येथील सीटी लॉन्स येथे आले होते. रात्री 10 वाजेच्या सुमारास नणंदेचा पती हा तेथे आला आणि मुलाला माझ्या ताब्यात द्या अशी मागणी करू लागला. त्यावेळी फिर्यादीच्या सासर्‍यांनी त्याला समजावून सांगत तू नाशिकला ये, येथे मुलाला घेऊन जाऊ नको असे सांगितले.

मात्र त्याने तुम्ही बाहेर या, तुम्हाला दाखवतो अशी धमकी देत तेथून निघून गेला. यानंतर रात्री 11 वाजता फिर्यादी या मुलाला सोबत घेऊन पार्किंगकडे जात असताना संशयित पुन्हा सीटी लॉन्सच्या गेटवर आला. त्याने मुलाला जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने विरोध केला असता त्याने शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीसोबत गैरवर्तन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles