अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी (अजित पवार) चे नेते अमोल मिटकरी यावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर याचा संबंध देखील अपघाताशी जोडला जात आहे. खरात प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे समोर आल्यानंतर याबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या. अमोल मिटकरी यांनी तर आता अजित पवारांच्या अपघातामागे अशोक खरातच मास्टरमाईंड असल्याची शंका व्यक्त करण्यास वाव मिळत असल्याचे म्हटले आहे.
अशोक खरातने बदललेले मोबाईल आणि केलेले फोन कॉल्स संपूर्ण प्रकरणात दुर्लक्षित राहिल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. विधान परिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करुन अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस खरात कोणाकोणाच्या संपर्कात होता याचा देखील एसआयटी प्रमुखांनी तपास करण्याची गरज मिटकरींनी पोस्टमधून व्यक्त केली आहे.
“अजित पवारांच्या विमान अपघातामागे कॅप्टन अशोक खरात हाच मास्टरमाईंड आहे या शंकेस वाव मिळतोय. खरातने बदललेले मोबाईल व केलेले फोन कॉल्स ही बाब या संपुर्ण प्रकारणात दुर्लक्षित राहिली आहे. २७,२८,२९,३०,३१ डिसेंबर २०२६ ला खरात वेगवेगळ्या मोबाईलवरून कुणाकुणाच्या संपर्कात राहून यथाकाळे कार्यसिद्धी करत होता हे एसआयटी तपास प्रमुखांनी तपासातून सिद्ध करायला हवे. मात्र एकंदरीत याच तपास कार्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होतय”, अशी पोस्ट करुन मिटकरींनी शंका व्यक्त केली आहे.
https://x.com/amolmitkari22/status/2057093193695744110/photo/1


