onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -23-05–2026 एकुण कांदा गोणी -39,193
लाल कांदा बाजार भाव

1 नंबर= 1000 ते 1300
2.नंबर= 600 ते 1000
3 नंबर= 350 ते 600

4 नंबर= 150 ते 300

————————————————————————————————————————————————–
तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला;सहा जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर:केडगाव लिंक रोड परिसरातील एका मैदानात बोलावून जुन्या वादा मिटवण्याच्या बहाण्याने एका 20 वषय तरुणावर कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर येथील पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद जालींदर साळवे असे हल्ल्‌‍यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हर्षद साळवे हा महाविद्यालयात शिक्षण घेतो. काही दिवसांपूव माऊ साळवे नावाच्या व्यक्तीने त्याला फोन करून विनाकारण वाद घालत शिवीगाळ केली होती. त्यानंतर कृष्णा त्रिभुवन याने हर्षदला फोन करून जुना वाद मिटवण्याच्या बहाण्याने केडगाव लिंक रोड येथील यंत्री हॉटेलच्या मागे बोलावले. हर्षद तिथे गेल्यानंतर आरोपींनी त्याला बोलण्यासाठी शेजारच्या मैदानात नेले.

मैदानात पोहोचताच हर्षद आरणे, माऊ साळवे, कृष्णा त्रिभुवन, आलेख आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी हर्षदला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी माऊ साळवे याने लाकडी दांडक्याने तर कृष्णा त्रिभुवन याने दगडाने मारले. याच दरम्यान हर्षद आरणे याने दुचाकीच्या डिक्कीतून कोयता काढून हर्षदच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्‌‍यात हर्षद गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ला करत असताना एका आरोपीने मोबाईलवर याचा व्हिडिओ देखील बनवला. हर्षदच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हर्षद आरणे, माऊ साळवे, कृष्णा त्रिभुवन, आलेख आणि दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles