विधान परिषद जागा वाटपाचा फॉर्म्युला? भाजपलाच सर्वाधिक जागा , मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीत जागा पदरात पाडून घेण्यासाठी घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. प्राथमिक बोलणीत एकूण १७ जागांपैकी भाजप १२, शिवसेना ३ व राष्ट्रवादी काँग्रेस २ या फॉर्म्युलावर चर्चा झाली. तर शिवसेनेने अधिक जागांवर दावा सांगितल्याने आज भाजप आणि शिवसेनेत खलबतं झाली. आज सकाळीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला शासकीय निवासस्थानी, नंदनवन येथे पोहचले. या बैठकीनंतर बावनकुळे यांनी महायुती १७ ही जागा जिंकणार असल्याचा दावा केला.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीची माहिती दिली. महायुती संदर्भातला निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. आता यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून चर्चा करतील. १७ जागेवर महायुती जिंकेल आणि मोठा विजय होईल. जवळपास ९९ टक्के मुद्दांवर एकमत झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसून उर्वरीत मुद्दावर चर्चा करतील. एक दोन विषय राहिले आहेत त्यावर तिघे अंतिम चर्चा करतील.सध्या जे सिटिंग आहे, त्यांना ती जागा द्यावी आणि नंतर संख्याबळाचा विचार करतो. ज्याचे संख्याबळ अधिक आहे, त्याचा विचार करतो. विधानसभा, लोकसभेवेळी चर्चा करताना हाच फॉर्म्युला होता. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीची चर्चा अंतिम टप्प्याकडे नेली आहे. आता शेवटचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत पूर्ण होईल. त्यामुळे भाजप या निवडणुकीत जास्त जागांवर लढण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles