सुजित झावरे पाटलांच्या एन्ट्रीने कर्जुले हर्यात राजकीय समीकरणे बदलणार

झावरे पाटलांच्या एन्ट्रीने कर्जुले हर्यात राजकीय समीकरणे बदलणार

पारनेर, कर्जुले हर्या गावात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आंधळे वस्ती ते कर्जुले हर्या या महत्त्वाच्या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभाला ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावत शिवसेना नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे जंगी स्वागत केले.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला दळणवळणाचा प्रश्न सुजित झावरे पाटील यांनी दोन महिन्यात मार्गी लावल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाळ्यात विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना रस्त्याअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, गावातील तरुण पिढी विकासाच्या प्रश्नांबाबत जागरूक झाली आहे. ग्रामस्थ आणि तरुणांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यास सर्वांगीण विकास साधता येईल. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कायम प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाला तरुणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लक्षवेधी ठरली. एकेकाळी माजी आमदार स्वर्गीय वसंतराव दादा झावरे पाटील यांना साथ देणारे हे गाव आता सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नव्याने उभारी देण्यासाठी सरसावले आहे. आगामी काळात झावरे पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदावर असताना झावरे पाटील यांनी कर्जुले हर्या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली होती. गावात दहा ते बारा बंधारे उभारल्याने शेती ओलिताखाली आली आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले. जलसंधारणाच्या कामांमुळे शेती उत्पादनात वाढ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

आजच्या कार्यक्रमात झावरे पाटील यांनी वाडी-वस्तीवरील विजेचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला किसन धुमाळ, प्रसाद झावरे, रवी आंधळे, राहुल आंधळे, संतोष उंडे, रामदास दाते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जुले हर्या येथे झालेला विकासाचा शुभारंभ आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलेला विश्वास पाहता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत झावरे पाटील यांना या भागातील वाढलेले पाठबळ राजकीय समीकरणे बदलवणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

या कार्यक्रमाला किसन धुमाळ, प्रसाद झावरे, रवी आंधळे, राहुल आंधळे, संतोष उंडे, रामदास दाते, रामा उंडे, संकेत वाफारे, मयूर आंधळे, सार्थक कोकाटे, सुनिल उंडे, नवनाथ आंधळे, कैलास उंडे, रामा कोकाटे, राहुल उंडे, ब्राम्हणणंद पाटील, विजय उंडे, प्रशांत वाफारे, दिलीप मोकाटे, संतोष रामदास उंडे, सिताराम उंडे, महिबूब पठाण, रोहन साळवे, बबन राधु उंडे, उत्तम आंधळे, मेजर रामदास उंडे, सावकार आंधळे, सुभाष आंधळे, गंगाराम उंडे, प्रज्योत शिर्के, वसंत आंधळे, संतोष शिर्के, दादू शिर्के, पंढरीनाथ उंडे, दिलीप उंडे, एकनाथ आंधळे, योगेश आंधळे, संग्राम उंडे, माऊली वाफारे, विकास हुलावले, सचिन कोकाटे, विजय काळे, गणपत वाफारे, सीताबाई उंडे, कल्याण उंडे, कल्पना आंधळे, मीराबाई आंधळे, वैशाली वाफारे, जनाबाई आंधळे, मनीषा आंधळे, जयश्री आंधळे, सुनीता आंधळे, मंगल चेमटे, वैशाली कानडे, समाबाई आंधळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles