शिक्षिका ”मुकाबला” गाणं वाजताच पूर्ण उत्साहाने डान्स करु लागते viral video

व्हिडीओमध्ये शिक्षिका प्रभू देवाचा ”मुकाबला- मुकाबला” या गाण्यावर कमाल डान्स करताना दिसतेय. तिच्या या जबरदस्त डान्सने आता सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे शिक्षिकेने चक्क साडी परिधान करुन हा भन्नाट डान्स केलाय.

शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सुरु आहे. यावेळी एक शिक्षिका ”मुकाबला” गाणं वाजताच पूर्ण उत्साहाने डान्स करु लागते. साडी नेसूनही ती प्रत्येक स्टेप एकदम परफेक्ट करतेय. प्रभू देवाच्या कठीण स्टेप्सही तिने अशा सहजतेने केल्यात जे पाहून उपस्थितही चकित झाले. शिक्षिकेचे डान्स करताना तिचे हास्य, तिचे हावभाव आणि तिची देहबोली यांने संपूर्ण वातावरणात आनंदून गेले.

शिक्षिकेचा जबरदस्त डान्स पाहून समोर बसलेले विद्यार्थी देखील टाळ्या, शिट्ट्या वाजून दाद देत होते. प्रत्येकजण तिच्या परफॉर्मन्सची मनापासून प्रशंसा करत होता, हे स्पष्ट दिसत होते. या व्हिडीओला आता सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles