10 अवैध दारू विक्रेत्यांवर व 1 जुगार अड्यावर कारवाई करुन 76,470 रु.चा मुद्देमाल जप्त…

मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 24/05/2026 ते 25/05/2026 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेने 04 पथके तयार करुन कारवाई करणे कामी रवाना केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने श्रीगोंदा, कोपरगाव तालुका, नेवासा, बेलवंडी, राहुरी, लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांची व अवैध जुगार चालणारे ठिकाणाची माहिती काढुन 11 ठिकाणी छापे टाकुन कारवाईमध्ये 10 अवैध दारू विक्रेत्यांविरूध्द व 01 अवैध जुगार खेळणा-याविरुध्द पोलीस स्टेशनला एकुण 11 गुन्हे दाखल केले असुन 76,470/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस स्टेशन निहाय अवैध दारु व जुगार अड्यावर करण्यात आलेली कारवाई खालीलप्रमाणे.
अ.नं. पोलीस ठाणे दाखल संख्या जप्त मुद्देमाल किंमत
1 श्रीगोंदा 03 6,920
2 लोणी 03 2,960
3 राहुरी 02 7,500
4 बेलवंडी 01 37,735
5 कोपरगाव तालुका 01 20,255
6 नेवासा(जुगार) 01 1100
* एकुण 11 76,470/-

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंदे चालु असल्यास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणे बाबत नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles