भाई का बर्थ डे, चिमुकल्याने जिवलग मित्रांना दिली अनोखी पार्टी Video

एखाद्या मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस. हा दिवस येण्याच्या काही दिवस आधीपासून सुरु झालेली धम्माल वाढदिवसाची खरी मजा असते. यानंतर केक कापून पार्टी आवर्जून केली जाते. पण, सोशल मीडियावरील झारखंडमधील एका चिमुकल्याच्या वाढदिवसाच्या पार्टीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

झारखंडमधील एका लहान मुलाचा साधासा वाढदिवस अगदी सगळ्यांसाठी सोहळा ठरला. कारण होतं त्याने दिलेली अनोखी पार्टी, ज्यात मॅगी, फँटाची बाटलीचा समावेश होता आणि या पार्टीचा आनंद घेण्यासाठी शेगडीभोवती उत्साही मुलांचा ग्रुपही दिसत होता. बर्थडे बॉय सूरज एका छोट्या स्टोव्हवर मॅगी नूडल्स शिजवत हसताना दिसला; तर जवळच काही मुले वाढदिवसाच्या मेजवानीची वाट पाहत उभी होती.

रीलची सुरुवात सूरजच्या एका मित्राने आनंदाने साजरा होणाऱ्या वाढदिवसाची ओळख करून देत केली. तो व्हिडीओमध्ये म्हणाला, “हॅलो मित्रांनो, आज सूरजचा वाढदिवस आहे. तो १०० रुपयांची मॅगी आणि फँटा घेऊन आला आहे. इथे खूप सारी मुलंही आहेत आणि तो आज आम्हाला पार्टी देणार आहे.”
साधेपणाने केलेली ही मांडणी असूनही, त्या प्रसंगातील जिव्हाळ्यानेच सोशल मीडिया युजर्सची मने जिंकली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles