आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी सराफा बाजार सुरू होताच सोने प्रति तोळाच्या दरात ३२० रूपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली होती. मात्र मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दर खाली आल्याचं दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे तेलाच्या किमती वाढलेल्या होत्या, ज्यामुळे महागाईची भीती आणि व्याजदरवाढीची शक्यता निर्माण झाली होती. नफा वसुलीमुळे (प्रॉफिट बुकिंग) ही घसरण झाली. देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली.दरम्यान महाराष्ट्रात साजरा केला जाणारा अधिक मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला रविवारपासून सुरुवात झाली. यामुळे सोने-चांदीच्या बाजारात खरेदी जोर वाढलाय. आज सराफा बाजारात सोन्याचे दर घसरल्याने रिटेल बाजारात खरेदी वाढेल असा अंदाज आहे.
२४ कॅरेट: १,५९,५३०
२२ कॅरेट: १,४६,२५०
१८ कॅरेट: १,१९,६४०
२४ कॅरेट: १,५९,३८०
२२ कॅरेट:१,४६,१००
१८ कॅरेट: १,१९,५४०


