अहिल्यानगर उपनगरात एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीसांचा जुगार अड्ड्यावर छापा
₹
अहिल्यानगर, दि. 26 मे 2026:
मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमणाथ सुदर्शन सो., अहिल्यानगर यांनी शहरात काही ठिकाणी अवैध जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स.पो.नि. जगदीश मुलगिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. 24/05/2025 ते 25/05/2025 या कालावधीत उपनगरातील वेगवेगळ्या 5 ठिकाणी छापे टाकून “कल्याण मटका” नावाचा अवैध जुगार चालवणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली.
कारवाईचा तपशील:
1. दि. 24/05/2025 रोजी पाईपलाईन रोड, एका हिरदगं शेजारी: आरोपी शशिकांत चंदर शिंदे, नितीन बाबाजी शिंदे, नागेश चंदर शिंदे यांना अटक. ₹4,000/- रोख, 3 मोबाईल व जुगार साहित्य असा ₹14,000/- चा मुद्देमाल जप्त. 2. दि. 24/05/2025 रोजी केडगाव, एकवीरा चौक: आरोपी गोविंद पारधे याला अटक. ₹3,450/- रोख व साहित्य असा ₹4,400/- चा मुद्देमाल जप्त. 3. दि. 24/05/2025 रोजी यश नगर, कामगार नाका: आरोपी इस्माईल याच्याकडून ₹4,400/- रोख जप्त. जुगाराचे साहित्य जागेवर जाळण्यात आले. 4. दि. 25/05/2025 रोजी वांगीपाल रोड, मोरया मंगल कार्यालयासमोर: आरोपी महेश रामदास लोखंडे व संकेत शहराव बर्डे यांना अटक. ₹2,650/- रोख, ₹7,000/- किमतीचे कापडी रोप्स, 33 चिट्ट्या व इतर साहित्य असा ₹16,250/- चा मुद्देमाल जप्त. 5. दि. 24/05/2025 रोजी पाथर्डी रोड: आरोपी प्रकाश जिवाजी गुंजाळ, राज.गजान कोल्हे, एम.आय.डी.सी. यांना अटक. ₹2,900/- रोख व साहित्य असा ₹2,900/- चा मुद्देमाल जप्त.
वरील सर्व कारवाईमध्ये एकूण ₹1,49,370/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सर्व आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12(अ) व इतर कलमांन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरेस यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस स्टेशनचे स.पो.नि. जगदीश मुलगिरे, पोलीस अंमलदार रेवननाथ दहीफळे, मिसाळ, विलास गारकल, शाहिद शेख, दिलीप शिंदे, धननाथ पालवे, बापू झरके, प्रमोद लहारे यांच्या पथकाने केली.
अहिल्यानगर पोलीस अवैध धंद्यांविरुद्ध अशाच प्रकारे धडक कारवाई सुरू ठेवणार असून, नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.
–


