सोशल मीडिया रील स्टार रोहिणी पाराध्ये यांची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर…. शेवटच्या इन्स्टा रिल

सोलापूर, 28 मे 2026: सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे सोशल मीडिया रील स्टार रोहिणी पाराध्ये हिने आत्महत्या केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांच्याच हॉटेलमधील स्वयंपाकाच्या खोलीत तिने ओढणीने गळफास लावून आपले जीवन संपवले. तिचा पती निलेश पाराध्ये याला ही गोष्ट समजताच त्याने तिला तातडीने रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. तिच्या अकस्मात मृत्यूमुळे सोशल मीडियावरील लाखो चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.

‘हॉटेल ग्रामपंचायत’मुळे प्रसिद्ध
ब्रह्मपुरी येथील रोहिणी पाराध्ये आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे जोडपे सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध होते. “हॉटेल ग्रामपंचायत” या नावाने त्यांचा व्यवसाय सुरू होता. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. हॉटेलचा व्यवसायही चांगला सुरू होता. नवनव्या डिश ते आणायचे, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. याच हॉटेलमधून ते अनेक रील्स तयार करून सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड करायचे, ज्याला मोठा प्रतिसाद मिळत होता.

किरकोळ वादातून टोकाचे पाऊल
दरम्यान, प्राथमिक तपासात हॉटेल उघडण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादानंतर रागाच्या भरात रोहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे ब्रह्मपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सोशल मीडियावरही शोक व्यक्त केला जात आहे. रोहिणी पाराध्ये यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक कारणातून घटना घडल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डी यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles