महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला,अहिल्यानगरची जागा भाजपच्या वाट्याला

आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज किंवा उद्या महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 16 जागा संदर्भातली चर्चा पूर्ण झाली असून छत्रपती संभाजीनगर, जालना विधान परिषदेच्या जागेवर अजूनही तिढा कायम आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष छत्रपती संभाजीनगर आणि जालना विधान परिषदेच्या जागेवर अडून बसले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आकडेवारी पाहता 14 ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, भाजपने आपल्या मित्रपक्षांना काही जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. आतापर्यंत 16 जागांची चर्चा पूर्ण झाली आहे त्यामध्ये भाजप 10, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, यवतमाळ, नाशिक, परभणी आणि हिंगोली या चार जागा येण्याची शक्यता. तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकणाची जागा मिळू शकते, असा अंदाज आहे. उर्वरित सर्व जागांवर भाजप लढेल, असे दिसत आहे. यामध्ये नागपूर, अहिल्यानागर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा-गडचिरोली-चंद्रूपर, भंडारा-गोंदिया, सातारा-सांगली या जागांचा समावेश आहे.

17 पैकी 16 जागांचा तिढा जवळपास सुटला, 16 पैकी दहा जागांवर भाजप चार जागांवर शिवसेना आणि दोन जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगर, जालना विधान परिषदेची जागेचा तिढा आज किंवा उद्या सुटल्यास अंतिम फॉर्म्युला समोर येईल. या निवडणुकीसाठी 1 तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

सोलापूर : भाजप

अहिल्यानगर – भाजप

ठाणे : शिवसेना

जळगाव : भाजप

सांगली-सातारा : भाजप

नांदेड : भाजप

यवतमाळ : शिवसेना

पुणे : राष्ट्रवादी

भंडारा-गोंदिया : भाजप

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – राष्ट्रवादी

नाशिक : शिवसेना

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : भाजप

अमरावती : भाजप

धाराशिव-लातूर-बीड : भाजप

परभणी-हिंगोली : शिवसेना

नागपूर : भाजप

छत्रपती संभाजीनगर-जालना – शिवसेना/ भाजप

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles