​अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाची रेकॉर्ड रूम चोरट्याने फोडली

​अहिल्यानगर-जिल्हा रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाची असलेली ‘एमएलसी’ रेकॉर्ड रूम अज्ञात चोरट्याने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुग्णालयाचे कनिष्ठ लिपिक कैलास काशिनाथ शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, कैलास शिंदे हे जिल्हा रुग्णालयाच्या एमएलसी विभागात काम करतात. रुग्णालयातील व्हिडिओ कॉन्फरन्स आणि सिटी स्कॅन रूमच्या जवळ असलेल्या खोली क्रमांक २८ मध्ये मागील १५ वर्षांचे न्यायालयीन व पोलीस केस संबंधित जुने रेकॉर्ड ठेवण्यात आलेले आहे. ५ जून रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे रेकॉर्ड रूम व्यवस्थित कुलूप लावून बंद करण्यात आली होती. त्यानंतर ९ जून रोजी सकाळी शिंदे हे जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी गेले असता, दरवाजाला आतून कडी लावल्याचे त्यांच्या लक्षात आले.

​त्यांनी पाठीमागच्या बाजूला जाऊन पाहिले असता रेकॉर्ड रूमची खिडकी उघडी होती आणि तिचे लोखंडी ग्रील गायब होते. खिडकीतून आत प्रवेश केला असता, खोलीतील सामान अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्याने खोलीतून वर्ष २०२१ ते २०२२ दरम्यानचे ‘एमएलसी ओपीडी क्ष-किरण’ (एक्स-रे) विभागाचे बांधून ठेवलेले २४ महत्त्वाचे गठ्ठे आणि खिडकीचे लोखंडी ग्रील चोरून नेले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लबाडीच्या इराद्याने ही चोरी करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles