सोनईत शेतकरी मेळावा: मुळा कारखान्याचे चेअरमन तुवरांचा मोठा निर्णय: निवडणूक लढणार नाही

सोनई, गेल्या 5 वर्षांपासून सहकारी साखर कारखानदारी अनेक अडचणींना सामोरे जात आहे. मोठ्या कष्टाने काटकसरीने कारभार करून मुळा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू आहे. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देता यावा, यासाठी इथेनॉल निर्मिती प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प उभारला. मुळा सहकारी साखर कारखाना निवडणूक यशस्वी पार पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करत माझा लढा सत्तेसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचा इशारा माजीमंत्री शंकरराव गडाख यांनी विरोधकांना दिला.

सोनई येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना गडाख बोलत होते. याप्रसंगी मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, हभप रामनाथ महाराज पवार, हभप अवेराज महाराज, विश्वासराव गडाख, माजी सभापती सुनीलराव गडाख, युवा नेते उदयन गडाख, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, मुळाचे व्हा. चेअरमन कडूबाळ कर्डिले, दत्तात्रय काळे, तुकाराम शेंडे, बाजीराव मुंगसे, बाप्पूसाहेब शेटे, भाऊसाहेब मोटे, रामभाऊ जगताप, कारभारी जावळे, अजित मुरकुटे, कैलास झगरे, प्रभाकर कोलते, काकासाहेब शिंदे, नानाभाऊ नवथर, श्रीरंग हारदे, अशोक हारदे, नानासाहेब रेपाळे, भाऊसाहेब लांडे, ॲड. आण्णासाहेब अंबाडे, अभिजित लुनिया, आण्णासाहेब पटारे, संजय सुखधान, कृष्णा शिंदे, मुक्तार शेख, कानिफनाथ येळवंडे, प्रा. गणपत चव्हाण, आबासाहेब फाटके आदी उपस्थित होते.

आगामी कारखाना निवडणूक लढणार नाही: तुवर
फक्त विरोधाला विरोध करून चांगल्या चाललेल्या संस्थेत विरोधकांनी राजकारण आणू नये. सहकारी साखर कारखानदारी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. मा. खा. यशवंतराव गडाख व माजीमंत्री शंकरराव गडाख यांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला सलग 11 वर्षे मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहण्याची संधी दिली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कारखाना निवडणूक न लढविण्याचे मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी जाहीर केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles