नगर शहरातील सीना नदीवरील उड्डाणपूल्याचं काम डॉ. सुजय विखे पाटील यांचं,नगरसेवक लोंढे यांचा लंके यांना अप्रत्यक्ष टोला

नगर शहरातील सीना नदीवरील उड्डाणपूल्याचं काम डॉ. सुजय विखे पाटील यांचं… श्रेय घेण्यासाठी फोटोसेशन दुसऱ्यांचं!

नगरसेवक महेश लोंढे यांचा खासदार निलेश लंके यांना अप्रत्यक्ष टोला

नगर -कल्याण रोडवरील अमरधाम परिसरातील सीना नदीवरील उड्डाणपुलाच्या स्लॅब कामाचा शुभारंभ आज दि. ६ जून नगरसेवक महेश लोंढे व नगरसेवक दत्ता गाडळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना महेश लोंढे यांनी नाव न घेता खासदार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला. “हे काम माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून आणि त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुरू झाले आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही जणांनी केवळ फोटोसेशन करू नये,” असा टोला त्यांनी लगावला. सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कामासाठी डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी मोठा पाठपुरावा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी पुलाच्या ठिकाणी भेट देत फोटोसेशन करण्यात आले होते. त्यानंतर श्रेयवादाच्या चर्चांना उधाण आले असून, आजच्या कार्यक्रमातून त्यावर अप्रत्यक्षपणे उत्तर देण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक दत्ता गाडळकर, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बोरुडे, भगवानराव काटे, हरीभाऊ यलदांडी, शरद दातरांगे, सागर अडसूळ, बालाजी रायपेल्ली, अभिषेक बाबर, ओंकार जेटला आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles