राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची लेक रेवतीचे आज (२० जून) लग्न आहे. नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच त्याचा हळदी व संगीत सोहळा पार पडला. रेवतीच्या विविध लूकचे अनेक फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत. याबरोबरच या सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली होती. लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानदेखील रेवती व सारंग यांच्या संगीत सोहळ्याला हजर होता, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो विविध गाण्यांवर डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख रेवती व सारंग यांच्याबरोबर डान्स करत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान त्याने या जोडप्याची गळाभेट घेतली, तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या. अभिनेत्याच्या लूकबद्दल बोलायचे, तर शाहरुख खानने या सोहळ्यात काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तसेच त्याची हेअरस्टाईलही लक्ष वेधून घेत आहे.
आणखी एका व्हिडीओमध्ये शाहरुखसह सर्वजण कोई मिल गया या गाण्यावर डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधले होते. शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर सुप्रिया सुळेदेखील दिसत आहेत.अनेक गाणी गायली. त्याच्या परफॉर्मन्सचेदेखील कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.
शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे तर तो सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचा किंग हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. शाहरुख खानबरोबरच या सिनेमात अभिषेक बच्चन, सुहाना खान, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, दीपिका पादुकोण, अनिल कपूर, राणी मुखर्जी हे प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनचा या सिनेमातील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच, दीपिका व शाहरुख खानचेदेखील काही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे.


