राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या बंडखोरीवर चर्चा ;शरद पवार स्पष्टच म्हणाले…..

शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. 6 खासदार थेट शिवसेना शिंदे गटात गेले. त्यांचा पक्षप्रवेशही झाला. 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटासाठी पत्रही दिले. खासदारांनंतर आता शिवसेना ठाकरे गटातील काही आमदारही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. यावर शिवसेनेसह इतरही पक्ष अलर्ट मोडवर आहेत. आमदारांची बैठकही ठाकरे गटाकडून घेतली जाणार आहे. यादरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटही अलर्ट मोडवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचेही काही आमदार आणि खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. यावर आता स्पष्ट बोलताना शरद पवार दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांंच्या बंडखोरीच्या चर्चांवर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.

शरद पवार यांनी म्हटले की, आमचा एकसुद्धा आमदार कुठे जाणार नाही. शरद पवार यांना विचारण्यात आले की, ठाकरेंच्या खासदारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे? यावर शरद पवार यांनी स्पष्ट बोलताना म्हटले की, आमचा एकसुद्धा आमदार कुठे जाणार नाही. यावेळी शरद पवार यांच्यासोबत गाडीत युगेंद्र पवारही होते.

शिवसेना ठाकरे गटातील खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार, खासदार बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता शरद पवार यांनी थेट भाष्य केले. राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसू शकतात. पक्षफुटीच्या मुद्द्यात सर्वच पक्ष अलर्ट मोडवर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यात ऑपरेशन टायगर राबवण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles