onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -25-06–2026 एकुण कांदा गोणी -74,983
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 2500 ते 2900
2.नंबर= 1800 ते 2500
3 नंबर= 1000 ते 1800
4 नंबर= 500 ते 1000
————————————————————————————————————————————————–
पतीला फोन केल्याने तरुणीसह कुटुंबाला मारहाण आयफोन हिसकावला; तीन जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर-पतीला फोन केल्याच्या कारणावरून वाद घालत एका तरुणीच्या घरात घुसून तिला, तिच्या आईला आणि बहिणीला लाथाबुक्यांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वडारवाडी, भिंगार येथे घडली असून याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकिता आशुतोष टाक, राखी रवींद्र बनसोडे आणि गणेश कुशाबा पाठक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या कुटुंबासह वडारवाडी परिसरात राहते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तिन्ही आरोपींनी संगनमत करून पीडित तरुणीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला. घरात घुसताच आरोपींनी माझ्या पतीला पुन्हा फोन केला तर तुझ्याकडे पाहून घेईन अशी धमकी देत वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी पीडित तरुणी, तिची आई आणि तिची बहीण यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पीडित तरुणीच्या हातातील महागडा आयफोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर पीडित कुटुंबाने थेट पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून तात्काळ भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.


