लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार ; नगर शहरातील घटना…

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
अहिल्यानगरः मागील तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेला बोलावून घेऊन, तिच्याशी लग्न करण्याचे खोटे आमिष दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक विश्वनाथ जावळे (रा. रानमळा मंठा, जिल्हा जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.पीडित महिला ही 23 वर्षांची असून ती खाजगी नोकरी करते. आरोपी दिपक याने पीडित महिलेला सावेडी नाका भागातील एका शाळेच्या पाठीमागे असलेल्या अपार्टमेंटमध्ये बोलावून घेतले होते. तू माझ्याविरुद्ध केलेली जुनी तक्रार मागे घे, मी तुझ्याशी लग्न करेन असे खोटे आमिष महिलेला दिले. त्यानंतर पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यास पीडितेने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने पिडितेस मारहाण केली. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपी दिपक जावळे याच्याविरुद्ध मारहाण, धमकी आणि अत्याचाराच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एकसिंगे आणि महिला सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles