नगर तालुक्यात जुगार अड्डयावर LCB चा छापा; 6 आरोपींकडून 3.69 लाखांचा मुद्देमाल

स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचा कामरगांव येथे तिरट जुगार अड्डयावर छापा
6 आरोपींकडून 3,69,900/- रु. कि. चा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर : प्रतिनिधी

मा. श्री. मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

पो.नि. श्री. संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि कृष्णकुमार सेदवाड यांच्या पथकाला अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दिनांक 21/07/2026 रोजी पथक अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत कामरगांव शिवारातील ताडपत्रीच्या शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून हारजितीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तात्काळ ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम जुगार खेळताना दिसले. पथकास पाहून एक इसम पळून गेला. उर्वरित 6 इसमांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यातील आरोपी :
1) चंद्रभान जयसिंग खोडवे वय 45 वर्षे, रा. कामरगांव, ता. जि. अहिल्यानगर
2) सोहम संदीप भिंगारदिवे वय 21 वर्षे, रा. सदर
3) भाऊसाहेब जनार्धन ठोकळ वय 55 वर्षे, रा. सदर
4) मनोज नाना झरेकर वय 41 वर्षे, सर्व रा. कामरगांव, ता. जि. अहिल्यानगर
5) किरण शाम भालके वय 35 वर्षे, रा. पिंपळगांव पिसा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
6) शिवाजी दत्तात्रय दिवेकर वय 44 वर्षे, रा. यशवंत कॉलनी, ता. शिरुर, जि. पुणे

चौकशीत पळून गेलेल्या इसमाचे नाव चंद्रकांत नागनाथ दांदेवाड, रा. केडगांव, ता. जि. अहिल्यानगर असल्याचे समजले. तसेच सदर जुगार अड्डा चालविणारा इसम गोरक्ष दिलीप कातोरे रा. कामरगांव असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पथकाने ताब्यातील आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल, वाहने असा एकूण 3,69,900/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ताब्यातील आरोपींविरुद्ध तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 628/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles