जुन्या वादातून बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी
टाकळी खातगाव परिसरातील धक्कादायक घटना;
अहिल्यानगर : कौटुंबिक वादातून व जुन्या वैमनस्यातून एका २४ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील चास ठाकरवाडी येथील रहिवासी मिलिंद मल्हार केदारे (वय २३) हे २१ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाकळी खातगाव परिसरात आपल्या भावी पत्नी व नातेवाइकां सोबत बसलेले होते. त्यावेळी संशयित आरोपी विनायक प्रकाश केदारे, विक्रम प्रकाश केदारे आणि प्रकाश सखाराम केदारे (सर्व रा. चास ठाकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे त्या ठिकाणी आले.
आरोपी विनायक याने “तू माझ्या पत्नीसोबत का राहतोस, अजून आमचा घटस्फोट झालेला नाही” असे म्हणत वाद घातला. यापूर्वीही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस मारहाण केली होती. या वादाचे रूपांतर काही वेळातच गंभीर हिंसाचारात झाले. आरोपींनी बेकायदेशीरपणे शिवीगाळ करत मिलिंद केदारे यांच्यावर चाकूने प्राणघातक वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या घरातील लोकांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी जखमी मिलिंद केदारे यांच्या फिर्यादीवरून २३ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी विनायक केदारे, विक्रम केदारे आणि प्रकाश केदारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील


