नगर शहरात माळीवाड्यात तरुणाला बेदम मारहाण ;कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

​अहिल्यानगर -शहरातील माळीवाडा भागातील ब्राम्हण गल्लीत मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार भांडण आणि मारहाणीची खळबळजनक घटना घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि रोख रक्कम बळजबरीने लांबवण्यात आली. ही घटना २१ जुलैच्या मध्यरात्री १२:०० ते १२:३० वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा खंडूअप्पा भागानगरे (वय ३०, रा. पंचपीर चावडी, अहिल्यानगर) यांना त्यांचा मित्र सागर डोंगरे याने फोन करून घरासमोर वाद सुरू असल्याची माहिती दिली. त्यामुळे कृष्णा भागानगरे हे घटनास्थळी गेले असता तेथे आरोपी केरप्पा हुच्चे उर्फ भाऊ, विशाल उर्फ बंडू हुच्चे, सुजाता हुच्चे आणि इतर चार अनोळखी महिलांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मित्राला हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व घाणघाण शिवीगाळ केली.

​मारहाणीदरम्यान आरोपींनी “आम्ही एकाला पिस्तूलने संपवले आहे, यांना पण संपवून टाकू” अशी धमकी देत फिर्यादीच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि खिशातील १०४० रुपये रोख रक्कम काढून घेतली. ​या घटनेनंतर कृष्णा भागानगरे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles