घरात घुसून महिलेवर हल्ला; नगर तालुक्यातील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

घरात घुसून महिलेवर हल्ला; खोसपुरी शिवारातील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर – तालुक्यातील खोसपुरी, पांढरीपूल परिसरात घरात घुसून एका महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाग्यश्री नितीन चव्हाण वय ३२, रा. खोसपुरी, पांढरीपूल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ८ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास त्या घरात झोपलेल्या असताना घराचा दरवाजा कोणीतरी वाजविला. दरवाजा उघडल्यानंतर अरुण ज्ञानदेव चव्हाण, ज्ञानदेव बेट चव्हाण, जयश्री अरुण चव्हाण आणि विजय गोपाळ्या भोसले हे समोर आले. त्यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली व निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ फिर्यादीने फेसबुकवर टाकला होता.

त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारास संशयित पुन्हा फिर्यादीच्या घरी आले. फिर्यादीला एकटीला पाहून दमदाटी केली. आवाज ऐकून फिर्यादीचे आई-वडील आले असता फिर्यादीचा हात धरून ओढाताण करण्यात आली. त्यानंतर फिर्यादीच्या मुलाला ओढून नेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आरोपींनी लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच पोटावर व पाठीवर मारहाण केली. “तुमच्या घरातील कोणी आम्हाला पैसे मागण्यासाठी आले तर सगळ्या घरादाराला जिवंत मारून टाकू” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

पोलिसांनी अरुण ज्ञानदेव चव्हाण, ज्ञानदेव बेट चव्हाण, जयश्री अरुण चव्हाण, नागेश नंदू चव्हाण आणि विजय गोपाळ्या भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles