नगर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरूणाविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर -अल्पवयीन मुलीवर (वय 17) वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (15 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सुरेंद्र जैस्वाल (रा. विळद, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

हा प्रकार ऑक्टोबर 2025, मार्च 2026 तसेच 2 ऑगस्ट 2026 रोजी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहतात. त्यांची मुलगी अल्पवयीन असून, संशयित आरोपीने तिला वारंवार घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरूध्द अत्याचार केल्याचा आरोप आहे.

विळद येथील हॉस्पिटलच्या गेटजवळ, एका हॉटेलजवळ तसेच एका लॉजिंग परिसरात 2 ऑगस्ट रोजीही हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी 15 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक कौटे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles