नगर तालुक्यात घरासमोरील अंगणात गांजाची शेती,आरोपीला अटक

अहिल्यानगर -तालुक्यात धनगरवाडी येथे स्वतःच्या घरासमोरील अंगणात गांजाची बेकायदेशीर लागवड करणार्‍या एका इसमावर एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख २३ हजार ६५० रुपये किमतीचा तब्बल ६४.७३ किलोग्रॅम ओला गांजा जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे धनगरवाडी येथे आरोपी अनिल लक्ष्मण विरकर (वय ४९ वर्षे) याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राहत्या घराच्या अंगणात आणि पायर्‍यांच्या जागेत गांजाच्या झाडांची लागवड केली होती. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे आणि पथकाने बुधवारी सायंकाळी घटनास्थळी धाड टाकली.या कारवाईदरम्यान पोलिसांनी अंगणातील गांजाची पाने, फांद्या व बोंडे असा एकूण ९ गोण्यांमध्ये भरलेला ६४.७३ किलोग्रॅम गांजा आणि मुद्देमाल ताब्यात घेतला. फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करून माल सील करण्यात आला.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुशांत सूर्यभान दिवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अनिल लक्ष्मण विरकर याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला रात्री पावणेबाराच्या सुमारास अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles